डोंबिवलीत इंदिरा चौकातील दुकानांना मोठी आग

राज्यात उन्हाचा तीव्र कडाका जाणवत आहे.  त्यातच डोंबिवलीच्या इंदिरा चौकात भर दिवसा तीन दुकानांना भीषण आग लागली. दुकानं जळून खाक झाली आहेत

डोंबिवली शहरातील वर्दळीचा परिसर असलेल्या इंदिरा चौकात दुपारच्या सुमारास तीन दुकानांना आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने काहीच वेळात तिन्ही दुकानं जळून खाक झाली.

सर्वात आधी एका दुकानाला आग लागली. तीने क्षणार्धात भीषण रुप घेतले आणि बाजूच्या दुकांनीही पेट घेतला. तिन्ही दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.  आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी, नक्की आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *