मुंब्रा खाडीत तीन मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

मुंब्रा येथील मुंब्रा खाडीत पोहायला गेलेल्या तीन १६ वर्षीय तरुणांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  बुडालेल्या एका तरुणाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मुंब्रा शहरातील हे तरुण खाडीमध्ये पोहण्यासाठी गेले असता ते बुडाले. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर तीनपैकी दोन मुलांना खाडीतून वाचवण्यात बाचाव पथकांना यश आले. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकजण बेपत्ता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *