सायकलपटू कमलाकर झेंडे यांचं निधन

शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू आणि घाटांचा राजा अशी ओळख असलेले माजी सायकलपटू, प्रशिक्षक कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन झालं.  त्यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना दोन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार न दिल्याने त्यांचे निधन झाल्याची तक्रार कुटूंबियांनी केली आहे.

कमलाकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कुटूंबियांनी दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी त्यांना दाखल करून घेण्यास मनाई केली. असे कमलाकर यांचा मुलगा प्रशांत यांनी म्हटले आहे.

पहिल्या रुग्णालयाने म्हटले की, ‘तुम्ही त्यांची आधी कोव्हिड19 टेस्ट करा. त्यावेळी रात्री 11 ची वेळ होती. एवढ्या रात्री आम्ही कुठे टेस्ट करणार? असा प्रश्न कुटूंबियांना पडला.

दुसरे म्हणजे डी.वाय.पाटील रुग्णालय! तेथील डॉक्टरतर वडिलांना तपासायलादेखील तयार नव्हते. साधी बेसिक ट्रिटमेंटसुद्धा देण्यात आली नाही’. ते म्हटले की, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. त्यांचा कोव्हिड रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना दाखल करता येणार नाही. असंही प्रशांत यांनी म्हटलं.

साधारण रात्री 1 वाजता कुटूंबाने YCMH या पिंपरी-चिंचवड पालिकेच्या रुग्णालयात धाव घेतली.  तेथील डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला. परंतू म्हटले की, कोव्हिड टेस्ट रिपोर्टनुसार सकाळी उपचार सुरू करू.

साधारण 3 वाजता, प्रशांत यांना YCMH रुग्णालयातून कॉल आला.  त्यांनी सांगितले की, ‘तुमच्या वडीलांची तब्बेत आणखी खालावली आहे. तुम्ही त्यांना परत न्या, किंवा इतर रुग्णालयात दाखल करा. प्रशांत यांनी तत्काळ ओळखीच्या माजी नगरसेवकाला फोन केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी बातचीत केली. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना तेथेच ठेवत काळजी आणि उपचार देण्याचे आश्वासन दिले.

सकाळी कुटूंब त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले.  तेव्हा ते ठिक दिसत होते. त्यांनी कपभर चहाही मागितली. परंतु अचानक त्यांची हालचाल बंद झाली. कुटूंबियांनी डॉक्टरांना याची माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांना तपासले ईसीजी केली. तोपर्यंत कमलाकर यांनी प्राण सोडला होता.

प्रशांत म्हणतात की, ‘त्यांच्या वडिलांचे निधन अपूऱ्या उपचाराअभावी झाले आहे. दोन रुग्णालयांनी त्यांना दाखल केले नाही. तिसऱ्यांनी योग्य उपचार दिले नाही. प्रत्येकजण कोव्हिड रिपोर्ट मागत होते. रिपोर्टचा हट्ट धरण्याआधी रुग्णालयांनी प्राथमिक उपचार केले असते. तर माझे वडिल वाचले असते. वडिलांच्या निधनाचे खापर त्यांनी असक्षम आरोग्य यंत्रणेवर फोडले’.

कमलाकर यांना कोणत्या रुग्णालयांनी नक्की कोणत्या कारणास्तव दाखल करून घेण्यास नाकारले, याबाबत चौकशी करण्याचे आदेश  पिंपरी-चिंचवडचे आयुक्तांनी दिले आहे.

रुग्णाल परत न्या, असा फोन कुटूंबियांना कोणी केला याबाबत तपास करण्यात येईल असे YCMH रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे.

डी वाय पाटील रुग्णालय प्रशासनानेही कुटूंबाच्या आरोपांची चौकशी करू असे म्हटले आहे.

असे सगळे असले तरी, महाराष्ट्राच्या सुपूत्राचे उपचाराअभावी असे निधन होणे हे मनाला चटका लावणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *