बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादला आला; कब्रस्तान परिसरात मृतदेह आढळला

औरंगाबाद महापालिकेच्या मुख्यालयाशेजारील कब्रस्तान परिसरात आज एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. विकास चव्हाण असे मृताचे नाव असून, तो नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील असल्याचे कळते.

औरंगाबाद महापालिका मुख्यालयाशेजारील कब्रस्तान परिसरात आज, शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला. रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, सिटी चौक पोलीस, गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली. मृतदेहाजवळ काही कागदपत्रे सापडली. त्यावरून मृत तरुणाचे नाव विकास चव्हाण असून, बँकेच्या परीक्षेसाठी तो औरंगाबाद येथे आल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. युवकाच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आज सकाळी त्याची परीक्षा होती; तत्पूर्वी सकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह आढळला, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *