उत्तर प्रदेशात लखनऊ – वाराणसी – नोएडामध्येही ‘नाईट कर्फ्यू’ची घोषणा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि वाराणसीमध्येही करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर

नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. याशिवाय, कानपूर आणि नोएडामध्येही नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. तसंच नाईट कर्फ्यू शिवाय प्रशासनाकडून काही गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत.

लखनऊ महानगरपालिका क्षेत्रात ८ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत हा कर्फ्यू लावण्यात आलाय. कर्फ्यू रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोविड प्रोटोकॉलसोबत काम सुरू राहणार आहे.

बुधवारी रेकॉर्ड ब्रेक १ हजार ३३३ करोनारुग्णांची नोंद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात नाईट कर्फ्यू लावण्याचे आदेश जारी केले आहेत.

या दरम्यान अत्यावश्यक गोष्टींना वाहतुकीची परवानगी असेल. फळ, भाज्या, दूध, एलपीजी, पेट्रोल, डीझेल, औषधं यांचा पुरवठा सुरू राहील. रात्र पाळीच्या सरकारी, अर्धसरकारी, आवश्यक सेवांत कार्यरत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नाईट कर्फ्यूतून सुट दिली जाईल. रेल्वे स्टेशन, बस डेपो, विमानतळावर येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना तिकीट दाखवल्यानंतर प्रवास करता येईल. या दरम्यान मालवाहू गाड्यांवर मात्र कोणतीही बंदी लावण्यात येणार नाही. मेडिकल, नर्सिंग आणि पॅरा मेडिकल इंस्टीट्यूट सोडून सर्व सरकारी, खसागी विद्यालय, महाविद्यालय तसंच कोचिंग संस्था बंद राहतील. केवळ परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या वेळी शाळा किंवा महाविद्यालय उघडण्याची परवानगी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *