देहविक्री करण्यास नकार देणाऱ्या पत्नीसोबत पतीचं पाशवी कृत्य; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

पत्नीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने पतीने गुप्तांगात दारुची बाटली घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाममध्ये ही घटना घडली आहे. पीडित महिला आणि आरोपी १० वर्षांपासून एकत्र आहेत. महिलेने आरोपी पतीविरोधात चंद्रशेखरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैशांसाठी पती आपल्याला देहविक्री करण्यास जबरदस्ती करत होता असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

पाच दिवसांपूर्वी महिलेने पतीच्या निर्णयाचा विरोध करत घरातून चालवत असणाऱ्या रॅकेटता भाग होण्यास नकार दिला होता. घटना घडली त्यादिवशी आरोपी दारुच्या नशेत घरी आला होता. यावेळी त्याने पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केली. यानंतर त्याने पत्नीच्या गुप्तांगामध्ये बाटली घुसवली. यानंतर पीडित महिला बेशुद्ध पडली होती.

महिलेने आपल्या आईला सगळा घटनाक्रम सांगितला. त्यांनी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘लग्न झाल्यानंतर तीन वर्षांनी पतीने आपल्यावर देहविक्री व्यवसायात येण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. गेल्या सता वर्षांपासून तो आपला छळ करतोय. आपण जेव्हा कधी नकार द्यायचो तेव्हा पती आपल्याला मारहाण करत असे’.

आरोपी रिक्षाचालक असून पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत एका भाड्याच्या घऱात राहता. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घरात बंदिस्त असलेल्या मुलीची सुटका केली. तसंच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *