मूल होत नसल्याने महिलेने दिला शेजाऱ्यांच्या मुलाचा बळी; मांत्रिकाच्या सांगण्यावरून केले हे कृत्य

एखादी इच्छा पुर्ण होण्यासाठी देवाला नवस बोलण्याची अनेकांना सवय असते. देवाला खुश करण्यासाठी काहीवेळा तर बळी देखील दिला जातो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ज्या अंधश्रध्दा र्निमूलनासाठी आपले आयुष्य वेचले त्या अंधश्रध्देमुळे आज देखील कित्येक लोकांचे बळी जात आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडली.

मूल होत नसल्याने मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार एका महिलेने तिच्या शेजार्‍यांच्या तीन वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्याचे शव प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ते दिल्लीच्या रोहिणी येथील इमारतीच्या छतावर फेकले. रविवारी ही घटना घडली असे पोलिसांनी सांगितले आहे.

अटक करण्यात आलेल्या २५ वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितले की, मुल व्हावं यासाठी तिच्यावर घरच्यांचा खूप दबाव होता. तिच्या सासरच्यानी आणि नातेवाईकांनी तिच्यावर अत्याचार करत असत. त्यांनीच तिला बळी देण्यास सांगणाऱ्या एका मांत्रिकाकडे नेले. त्या मांत्रिकाने देवाला संतुष्ट करण्यासाठी एका मुलाचा नरबळी देण्यास सांगितले. त्यानंतर तिने तिच्या शेजारच्या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरला, असे पोलिसांनी सांगितले आहे.
नीलम गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. तिने पोलिसांना सांगितले की तिचे २०१३ मध्ये लग्न झाले. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरही त्यांना मूल होऊ शकले नाही. म्हणून ती चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या हरदोई येथील तिच्या मूळ गावी एका मांत्रिकाकडे गेली. मूलं हवं असेल तर एका मुलाचा बळी द्यावा लागेल, अशी सूचना त्याने केली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

शनिवारी बेपत्ता झालेल्या मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार करून ही बाब उघडकीस आणली आणि त्यानंतर मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून शोध घेण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

शोधमोहीमेदरम्यान कर्मचार्‍यांपैकी एकाला लागून असलेल्या घराच्या छतावर एक बॅग दिसली. जेव्हा ती उघडली तेव्हा गळ्यावर जखम असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. प्राथमिक पोलिस अहवालात सांगितले की, मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मुलाच्या वडिलांच्या विधानावर आधारित खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *