“जगण्यात काहीच अर्थ नाहीय, कोणावरही प्रेम करुन नका”, म्हणत भाजपा खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस

उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंजमधून भाजपाचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर यांच्या सुनेनं म्हणजेच अंकिता किशोरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. खासदार किशोर यांच्या घरासमोरच अंकिताने आपल्या हाताची नस कापली. पोलिसांनी तातडीने अंकिताला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखलं केलं. वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला असून तिच्या जिवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी अंकिताने रविवारी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये अंकिताने पती आयुषवर गंभीर आरोप केले होते. आपली फसवणूक झाल्याचेही अंकिताने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

रुग्णालयामध्ये अंकिताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी आयुषच्या घरासमोरच ब्लेडने माझी नस कापल्याची कबुली दिली आहे. मी नस कापली तेव्हा तिचा पती आयुष आणि अंकिताची सासू अंगणामध्ये फेऱ्या मारत होते. कोणीही मला आडवण्याचा प्रयत्न केला नाही. दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी आले असा अरोप अंकिताने केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अंकिता रडताना दिसून येत आहे. अंकिताने पोलीस आणि आयुषच्या घरच्यांवर गंभीर आरोप या व्हिडीओमधून केले आहेत. “आयुष माझ्याकडे पुन्हा येईल याची मी कधीपासून वाटत पाहत होते. रविवारी आयुष माहिला कार्यालयामध्ये गेला होता. मी त्याला भेटण्यासाठी तिथे गेले तर पोलिसांनी तो आला नाहीय असं सांगून मला बाहेर काढलं. सर्वजणांचे एकमेकांशी साटंलोटं आहे. आयुष तिथेच आहे पण तो मला भेटला नाही,” असं अंकिताने या व्हिडीओत म्हटलं आहे.

“तू स्वत: (आयुष) मला सांगायचा की घरचे माझ्यावर प्रेम करत नाहीत. पण मी कायम तुझ्या सोबतच राहिले. मात्र तू माझ्याकडून सारं काही हिरावून घेतलं. यामध्ये तुझं तर काहीच नुकसान झालं नाही. तू तुझ्या घरच्यांकडे निघून गेलास माझा विचार न करता. घराचं भाडं दिलेलं नाही. गॅसही संपला आहे. मी जेवले आहे की नाही याचीही तू चौकशी केली नाही. मी आता खूप दूर चालले आहे. तुला हे कायम लक्षात राहील. चूक माझीच आहे की मी तुझ्यासोबत राहिले,” असंही या व्हिडीओमध्ये अंकिताने म्हटलं आहे. आता माझ्या जगण्याचा काहीच अर्थ नसून कोणाच्याही प्रेमात पडू नका असा उल्लेखही अंकिताने या व्हिडीओमध्ये केलाय.

काही दिवसांपूर्वीच आयुषवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आयुषने हा हल्ला अंकिताने घडवून आणल्याचा आरोप केला होता. या गोळीबार प्रकरणाचा पोलीस तपास करत असतानाच आता अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *