मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तेल माफियांचे बस्तान

देशभरामध्ये इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्या असताना मुबंई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरच्या जवळपास धाब्यावर तेल माफियांचे मोठे बस्तान असल्याचे समोर येत आहे. मनोरजवळच्या अनेक धाब्यांवर इंधन चोरीचे आणि काळ्या बाजारात चोरीचे इंधन विक्रीची टोळी कार्यरत आहे.

चालकांच्या सहभागाने धाब्यावर येणाऱ्या टँकरमधून मोठ्या इंधन टाकीमधून काढले जाते. टँकरमधून डिझेल काढून ते विहिरीसारख्या सिमेंटच्या टाकीत तात्पुरते साठवले जाते. नंतर रात्र झाल्यानंतर चोरलेले इंधन प्लास्टिक टाक्यांमध्ये भरून विक्रीसाठी काळ्या बाजारात पाठवले जात असल्याचे पुढे येत आहे.

या तेल माफियांची हिम्मत वाढली असून त्या विरोधात कोणी आवाज उठवायला गेले तर त्या व्यक्तीला मारहाण धमक्या देण्यापर्यंत या माफियांची मजल जात आहे. इतका मोठ्या प्रमाणात प्रकार सुरू असूनही स्थानिक पोलिसांकडून याविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही.

पोलीस या इंधनचोरी करणाऱ्यांच्या विरोधात छोटी-मोठी कारवाई करतात. परंतु मुख्य सूत्रधार अटक होत नसल्याने पोलिसांनी पाठ  फिरवतात पुन्हा ऑइल माफियांचे धंदे सुरू  होतात.  या कारवायांकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे.

या ऑइल माफियांना चोरी करताना अनेक वेळा आम्ही पाहिले आहे, या विरोधात पोलिसांनादेखील अवगत केले आहे, परंतु मुख्य आरोपीला अटक होत नाही, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत.

तेल माफियांवर आम्ही एकदा कारवाई केली होती, आताही रात्रीची गस्त चालू आहे, असे प्रकार सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *