मुख्य सूत्रधार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबादेत ठोकल्या बेड्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथकं बोठेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना माहिती होऊन नये म्हणून हॉटेलमधील रुमचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या, अशी माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर पोलिसांनी भिंगारदिवे याला अटक केली होती. तर बोठे मात्र फरार झाला होता. फरार होताना त्याने त्याचे दोन्ही मोबाइल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाइल जप्त केलेले आहेत. तसेच बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथक रवाना करण्यात आलेली होती. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर मिळून आले होते. बोठे याच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचं तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही मिळून आल्या होत्या.

बोठे याला अटक करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह हैदराबाद पोलिसांची मदत अहमदनगर पोलिसांनी घेतली होती. बोठे हैदराबादमध्ये असल्याचं माहिती झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, याची माहिती मिळाल्याने आरोपी बोठे काही मिनिटांच्या अंतराने पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *