अंबरनाथ पूर्वेकडिल आनंदनगर एमआयडीसीमधील प्लॉट नंबर 40 येथील आर के बेकवेलमार्स नावाच्या बिस्कीट कंपनीला आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . या कंपनीत बिस्कीट बनवले जातात . आग लागल्याचे कळताच सुरक्षा रक्षकाने याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली .काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कंपनीला वेढा घातला होता . आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले
