राज्यात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. अमरावतीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर दिसून येत आहे. अमरावती महानगर पालिकेत काम करणारे 80 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल आहे. 80 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अमरावती महानगर पालिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात डॉक्टर आणि अभियंत्यांसह सर्व पदांवर काम करणारे लोक समाविष्ट आहेत. अमरावती महानगरपालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 3,000 असल्याचे सांगण्यात आहे. याशिवाय खासगी स्वरुपात काम करण्यासाठी कर्मचारीही कामावर घेण्यात आले आहे.
