कोरोना सेंटरमध्ये डॉक्टराचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी बातमी औरंगाबादहून (Doctor Attempt to Corona Patinet at Corona Center) समोर आली आहे. कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरांनी रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद (Aurangabad Doctor) शहर पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मारहाण केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टराने पीडित महिलेचा मोबाइल नंबर मिळून दररोज तिला फोन करून त्रास द्यायचा असा आरोपही करण्यात आला आहे. बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिनमध्ये बोलावलं. त्यानंतर एकांतात या डॉक्टरने तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचंही समोर आलं आहे. या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. तसेच या घटनेनंतर डॉक्टरला रुग्णालयातून हटवण्यात आले आहेत. तस

त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मात्र तरूणीने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही.  मात्र महापालिला आयुक्तांना सगळं प्रकार सांगितला त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली आहे, मात्र कोरोना केंद्रावर ही महिला सुरक्षित नाही हे म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *