अंगारकी चतुर्थीवरही कोरोनाचं सावट; मंदिरात प्रवेश बंद

गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी मंदिरात आज प्रवेश बंद आहे. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात आज केवळ क्यूआर कोड असणा-यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. दगडूशेठ मंदिर, गणपतीपुळ्यात तसंच टिटवाळ्याच्या मंदिरात आज प्रवेशावर बंदी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिर परिसरात अंगारकी चतुर्थीला संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरवर्षी अंगारकीला मोरया गोसावी गणपती दर्शनाला 80 हजार भाविक येतात. यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय. तर परिसरातील दुकानंही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *