देशभरात सोमवारी करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या लसीकरणाने करोना याची सुरुवात झाली. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात सकाळी ७ वाजता देशी ‘कोव्हॅक्सिन’ची लस घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील लस घेतली असून पात्र असणाऱ्या सर्वांना घेण्याचं आवाहन केलं आहे. याआधी शरद पवार यांनीदेखील जे जे रुग्णालयात जाऊन करोना लस घेतली.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लस घेतल्याची माहिती दिली आहे. “मुंबईमधील जे जे रुग्णालयात मी करोना लसीचा पहिला डोस घेतला. डॉक्टर लहाने आणि जे जे रुग्णालयातील सर्व टीमचे आभार. करोना लस सुरक्षित आहे. सर्वांना विनंती आहे की, नोंदणी करा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा लस घ्या”.
