हत्या केल्यानंतर ह्रदय शिजवलं आणि जेवायला वाढलं; त्यानंतर….

अमेरिकेतील तिहेरी हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने पीडित महिलेचं ह्रदय काढून शिजवल्याच्या विकृत प्रकाराने पोलीसही चक्रावले आहेत. इतकंच नाही तर आरोपीने ह्रदय शिजवल्यानंतर इतर दोन पीडितांना त्यांच्यावर हल्ला करण्याआधी बटाट्यांसोबत वाढलं होतं असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

ओकलाहोमा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी ओकलाहोमा सिटी न्यूज ४ टीव्ही आणि ओकलाहोमा वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी लॉरेन्स पॉल अँडरसन याने आपल्या शेजाऱ्याची चाकूने वार करुन हत्या केली आणि त्यानंतर त्याच्या शरिरातील अवयव बाहेर काढला. यानंतर लॉरेन्स आपल्या काकांच्या घरी पोहोचला होता. तिथे त्याने ह्रदय शिजवलं आणि त्यांना जेवणातून वाढण्याचा प्रयत्न केला”.

यानंतर आरोपीने आपल्या काका आणि त्यांच्या चार वर्षांच्या नातीची हत्या केली. ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. आरोपी अँडरसनची सुटका केल्याच्या काही दिवसांनी ही माहिती समोर आली. ड्रग्जच्या आरोपाखाली २०१७ मध्ये त्याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयात त्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *