बॅटऱ्या चोरणाऱ्यास पोलिस कोठडी

शाळेच्या आवारात उभ्या बसमधील ६० हजारांच्या १६ बॅटऱ्या व शाळेतील वॉचमनची दुचाकी चोरणाऱ्यास, सातारा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी जप्‍त करण्यात आली आहे. अहमद खान नजीर खान (वय २७, रा. बंजारानगर मेरागड्डी, हैदराबाद, तेलंगणा. ह. मु. नारेगाव-औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. विजय कृष्णमूर्ती विल्सन यांनी फिर्याद दिली होती. विजय हे रियान इंटरनॅशनल शाळेत काम करतात. चोरट्याने सात डिसेंबर २०२० रोजी रात्री हा ऐवज लंपास केला. नाकाबंदी दरम्यान वेदांतनगर पोलिसांनी चोरीची दुचाकी वापरणारा आरोपी अहमद खानला अटक केली. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच शाळेच्या वॉचमनची चोरलेली दुचाकी पोलिसांनी जप्‍त केली. त्यानंतर आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *