लस घेतलेल्या 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण

राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येची  आकडेवारी पुन्हा वाढतेय. लसीकरण अद्याप सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले नाहीय. असे असतान औरंगाबादमधून कोरोनासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येतेय. औरंगाबादेत लस घेतलेल्या 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीये.

लस घेतल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झालीये. कोरोना झालेले दोन्ही डॉक्टर्स हे वयस्कर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यासह रायगडावरही उत्साहाचं वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाने रोषणाई केली आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेली रोषणाई पाहून छत्रपती संभाजीराजे भोसले हे चांगलेच भडकले. ” भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,” असा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

करोनामुळे शिवजयंती सोहळा साजरा करण्यावर राज्य सरकारकडून काही सूचना आणि नियमावली जारी करण्यात आलेल्या असल्या, तरी सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरही रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या रोषणाईबद्दल छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगीबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून. या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,” अशा शब्दात संभाजीराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *