कोल्हापूरच्या राजाराम तलावात बॅगमध्ये महिलेचा अर्धवट देह

कोल्हापुरातील राजाराम तलावात महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एका पिशवीत मृतदेह होता. सकाळी या परिसरात फिरायला येणाऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. राजारामपुरी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम तलाव परिसरात पिशवीमध्ये मृतदेह असल्याचे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे खळबळ उडाली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तेथे गर्दी झाली होती. काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. राजारामपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता, पिशवीमध्ये महिलेचा अर्धवट देह आढळून आला. महिला वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

महिलेची हत्या करून तिचा अर्धवट देह पिशवीत भरून तलावात फेकला. पोलिसांनी पंचनामा करून देह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, महिलेची ओळख पटवण्यात येत आहे. याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *