प्रजासत्ताक दिनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुलांचे आई-वडील मोलमजुरी करतात. कामासाठी ते मंगळवारी बाहेर गेले होते घरी असणारी मुले दुपारी घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या दगडखाणीत पोहोण्यासाठी गेले होते . खोल पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही त्यावरून ते बुडून मृत्यू पावले.
सायंकाळी घरी आलेल्या आई-वडिलांना मुले दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध केली असता खाण्यातील पाण्यात दोघांचे मृतदेह आढळले. दरम्यान बारामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मुलांची मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामती शहरातील सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालयात घेऊन देण्यात आले आहेत. बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
