नागपूर मेट्रोमध्ये रंगला पारंपरिक कार्यक्रम

नागपूर  मेट्रोमध्ये अश्लील डान्स आणि जुगार अड्डा सुरू असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं नागपूरकरांमध्ये संतापाचं वातावरण होतं. मात्र त्याच नागपूर मेट्रोमध्ये आज चक्क एक पारंपरिक कार्यक्रम रंगला. संक्रांतीच्या निमित्तानं सध्या सगळीकडेच हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पण हा हळदीकुंकू एकदम खास आहे. कारण नागपूर मेट्रोच्या डब्यात शनिवारी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ रंगला.

पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून आलेल्या जिल्हा परिषद शिक्षिकांनी धावत्या मेट्रोमध्येच हळदीकुंकू साजरा केला.. एकमेकींना वाण देत आनंदाची उधळण केली. या महिला आपल्या मुलाबाळांना देखील सोबत घेऊन आल्या होत्या. मेट्रो राईडचा आनंद घेत एकमेकींशी भरपूर गप्पाही मारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *