गावकऱ्यांनी फेकलेला जळता टायर हत्तीच्या कानात अडकला आणि त्यानंतर…

गावकऱ्यांनी पेटवून दिल्याने हत्तीला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. तामिळनाडूत हा प्रकार घडला आहे. हत्तीला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी जळता टायर त्याच्या दिशेने फेकला होता अशी माहिती समोर आली आहे. जळता टायर हत्तीच्या कानात अडकला आणि यामुळे त्याची धावपळ झाली. मसिनागुडी येथे झालेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एक व्यक्ती हत्तीला पळवून लावण्यासाठी जळत्या गोष्टी त्याच्या दिशेने फेकत असल्याचं दिसत आहे. आगीमुळे हत्तीची पाठ आणि कान पूर्णपणे जळालं होतं. १९ जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी हत्तीला नेलं जात असताना त्याचा मृत्यू झाला.हत्तीची प्रकृती अत्यंत ढासळली होती. वैद्यकीय उपचारासाठी नेण्यापूर्वी हत्तीला शांत करण्यात आलं होतं. मात्र उपचाराला जात असतानाच हत्तीचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार असल्याचं मसिनागुडी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *