पेण बलात्कार, हत्या प्रकरण

पेणमध्ये 30 डिसेंबर रोजी एका तीन वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात होती. या प्रकरणातील नराधमास जामीन मिळू नये व हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. 21 दिवसांत याबाबतचा निकाल लावण्यात येईल, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले होते. उद्या एकविस दिवस पूर्ण होत असून, कार्यवाहीत शिथिलता असल्याबाबत चर्चा होत असल्याने, पाठपुरावा करणारी मूलभूत अधिकार संघर्ष समिती व राष्ट्रीय आदिवासी संघटना दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी तहसील कार्यालय, पेणसमोर सकाळी दहा वाजल्यापासून लक्षवेधी ठिय्या आंदोलन करणार आहे.

पेण मळेघर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या करणार्‍या नराधमास जामीन मिळू नये व सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा व्हावी या व अन्य नमूद मागणीकरिता नगरपालिका चौक ते तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यापर्यंत सर्व सामाजिक संघटना, सुजाण नागरिक यांच्या सहभागाने रॅलीद्वारा निवेदन देण्याचे आवाहन राष्ट्रीय आदिवासी संघटना व मूलभूत अधिकार संघर्ष समितीद्वारे करण्यात आले होते.

रॅलीमध्ये विविध सामाजिक आदिवासी संघटनांबरोबर हजारो नागरिक सहभागी झाले होते. केस गांभीर्य व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन व गृहराज्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे ही केस चालवण्यात येईल, असे सदर शिष्टमंडळास आश्‍वासन दिले होते. 21 दिवसांत ते आपणास समजेल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. उद्या एकवीस दिवस पूर्ण होत आहेत आणि आदिवासी बांधव व जनमानसात या कार्यवाहीमध्ये शिथिलता असल्याबाबत चर्चा होत आहे. मूलभूत अधिकार संघर्ष समिती व राष्ट्रीय आदिवासी संघटना पाठपुरावा करत आहेत. त्याकरिता दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी तहसील कार्यालय, पेणसमोर सकाळी दहा वाजल्यापासून लक्षवेधी ठिय्या आंदोलन करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *