‘ड्रॅगन’ हे फळ तुम्हाला माहीत असेलच… पण गुजरातमध्ये मात्र हे फळ ‘ड्रॅगन’ नावानं नाही तर ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ड्रॅगन’ या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून ‘कमलम’ करण्यात आलाय.
कमलम : कमळाचं फूल
संस्कृत भाषेत ‘कमलम’चा अर्थ कमळाचं फूल असा होतो. नुकतंच हे फळ भारतात लोकप्रिय झालंय. अनेक ठिकाणी बाजारात हे फळ सहजगत्या उपलब्धही होतं. उष्णकटीबंधातील हे फळ आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखलं जातंय.
या फळाचं नाव बदलण्याची गरज का वाटली? याबद्दल बोलताना विजय रुपानी यांनी म्हटलं ‘या फळाचं नाव चीनशी निगडीत असल्यानं आम्ही या फळाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे’.

