गोदापात्रामध्ये आढळले ‘त्या’ मायलेकींचे मृतदेह

नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील बसस्थानकावरून चार तारखेला बेपत्ता झालेल्या ज्योती योगेश राठी (वय २५) आणि त्यांची मुलगी जिया (वय ३ वर्षे) यांचे मृतदेह गोदापात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ज्योती राठी यांचा मृतदेह सात जानेवारीला रामवाडी पुलाजवळ पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्यानंतर १४ तारखेला जिया या चिमुकलीचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. दोघींचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची त्यांची ओळख पटली. या मायलेकी नांदूरशिंगोटे येथून चार जानेवारीला बेपत्ता झाल्याची नोंद वावी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. सोशल मीडियावरूनही या मायलेकींचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. त्या आढळल्यास संपर्कसाठी मोबाइल क्रमांकही देण्यात आले होते. त्या बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी ज्योती यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता. पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. गोदापात्रात पाणी सोडलेले असल्याने जियाचा मृतदेह होळकर पुलाखालून गांधी तलावात वाहत गेला होता. एकमुखी दत्त मंदिराच्या समोरच्या बाजूला तलावात तो आढळून आला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *