पुण्यात भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वारंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत.
जमीन व्यवहार (Bhosari MIDC land purchase) या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.
