वाडा तालुक्यात एकुण २४ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात विविध ठिकाणी दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर नव्याने वृक्षारोपण करण्यात येते. शासनाने हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करुन या ठिकाणी लाखो रुपये खर्च केले आहेत. येथील जंगल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी या किल्ला परिसरापासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कंचाड वनपरिक्षेत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. येथील वन अधिकाऱ्यांची व वन कर्मचाऱ्यांची नेहमीच येथे गस्त सुरू असते. तरीसुद्धा रात्री अंधाराचा फायदा घेऊन प्राण्यांची शिकार करण्यासाठी येथील शिकारी कोहोज किल्ला परिसरात वनवे लावत असतात.
येथील जंगल परिसरात गस्त घालण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही तसा प्रकार आढळून आल्यास वनविभागाला माहिती द्यावी.
