तीन जिल्ह्य़ांचा लससाठा ठाण्यात

भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही करोना लशीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास मान्यता दिल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेकडे सर्वाचे लक्ष लागले असतानाच, ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्य़ांसाठी १ लाख ३ हजार लशीचे डोस बुधवारी पहाटे जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. या लशीच्या डोसचे महापालिकांना वितरण करण्याचेही काम सुरू झाले आहे. येत्या १६ जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्य़ात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

उपलब्ध झाले आहेत. ठाणे मंडळामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्य़ांचा समावेश आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या लशीचे तीन जिल्ह्य़ांत वितरण करण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्य़ाला ७४ हजार, पालघर जिल्ह्य़ाला १९ हजार आणि रायगड जिल्ह्य़ाला ९ हजार लशीचे डोस मिळणार आहेत.

जिल्ह्य़ातील महापालिकेने लाभार्थ्यांची यादी तयार करून दिली असून त्याप्रमाणे महापालिकांना लशीचा साठा दिला जाणार आहे. लशींचा साठा पोहोचविण्याचे कामही सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांत लसकुप्या पोहोचवण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्य़ाला ७४ हजार कुप्या देण्यात येणार असल्या तरी पहिल्या टप्प्यासाठी  ठाणे जिल्ह्य़ातील ६२ हजार ७५० सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. या सर्वाना ही लस दिली जाणार आहे, तर उर्वरित दहा टक्के लशीचा अतिरिक्त साठा असणार आहे.

देशावर करोना हे मोठे संकट आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशातील वैज्ञानिकांनी प्रयत्न करून ही लस तयार केली आहे. कोणतीही लस किंवा औषध घेतल्यावर अनेकांना दुष्परिणाम होत असतात; परंतु, याची खबरदारी म्हणून प्रत्येक केंद्रात डॉक्टर तसेच इतर वैद्यकीय सामग्री सुसज्ज करून ठेवली आहे.

महापालिकेनुसार लसीचे वर्गीकरण

महापालिका                   लस

ठाणे                              १९,१००

कल्याण – डोंबिवली        ५ ,८००

नवी मुंबई                       २१,२५०

उल्हासनगर                  ५,३००

भिवंडी                          ३,३००

मिरा भाईंदर                 ८०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *