जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. यातून 840 सदस्यांची निवड केली जाणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक आयोगाने लगेचच उमेदवारांना चिन्ह वाटप सुरू करण्याचा कार्यक्रम होता. मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगतीने रात्री उशिरापर्यंत किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तसेच किती रिंगणात उभे आहेत याबाबत काहिच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
अलिबाग तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या 38 जागांसाठी घेण्यात येणार्या निवडणूकीत आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 58 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात उर्वरित 80 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. यापैकी सासवणे ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच शेकापच्या उमेदवार भाग्यश्री नाखवा या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
