ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे महाराष्ट्रात अधिक सतर्कता बाळगली जाते आहे.

ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे महाराष्ट्रात अधिक सतर्कता बाळगली जाते आहे. मात्र तरी देखील परदेशातून अन्य राज्यात उतरून त्याठिकाणाहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे.

यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *