जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

काले तालुका कराड येथील जवान दैवत दत्तात्रय साळुंखे (वय ३६) यांचे सोमवारी दुपारी अपघाती निधन झाले होते. मंगळवारी दुपारी काले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दैवत साळुंके यांच्या निधनाने काले परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, मुलगा मुलगी, बहिणी, असा परिवार आहे.

सन २०००साली सैन्य दलात भरती झालेले जवान दैवत साळुंखे यांनी नाशिक, आसाम, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आदी भागात आपले कर्तव्य बजावले होते. सध्या ते औरंगाबाद येथील ४१ अर्टलरी डिव्हिजन येथे हवालदार पदावर कार्यरत होते. सोमवारी ते कर्तव्यावर हजर झाले. मात्र, दुपारी औरंगाबाद येथे त्यांचे अपघाती निधन झाल्याचे समोर आले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून साळुंखे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. काले ग्रामस्थांनी बंद पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *