दहा लाख रुपयांची दारू पकडली

गोव्यातून कर चुकवून आणलेली दारू दुसऱ्य़ा बाटल्यांमध्ये भरून विक्री करणारे रॅकेट जामखेड येथील उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणले. तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दहा हजार मोकळ्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार भाऊसाहेब गरड हा फरारी झाला आहे.

 जामखेडमधील हॉटेल साईराम येथे गोव्यातील दारू वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या बॉटल्यांमध्ये भरून विकली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी महेश शिवाजी काकडे (रा. झिकरी, जामखेड), ऋषिकेश अशोक काकडे (रा. बोरले, जामखेड) या दोघांना ताब्यात घेतले. झडती घेतल्यानंतर दारूचा साठा आढळून आला. गोव्यातील दारुचे ५७ बॉक्स, प्लॉस्टिकचे सिलकॅप २८ हजार, पत्री बूच २ हजार, पाच हजार लेबल, तब्बल दहा हजार बाटल्या आढळून आल्या. तसेच कार असा तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सी. पी. निकम, निरीक्षक ए. बी. बनकर, ए. व्ही. पाटील, संजय सराफ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *