राधाकृष्ण विखे पाटलांना मातृशोक

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५वर्षाच्या होत्या. प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात डॉ. अशोक विखे, राधाकृष्ण विखे आणि डॉ.राजेंद्र विखे ही तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. खासदार डॉ.सुजय विखे यांच्या त्या आजी आहेत.

रविवारी दुपारी १२वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *