उल्हासनगरात इमारत कोसळली; वेळीच रिकामी केल्यानं १०० जण वाचले

कॅम्प तीनमधील ‘महक अपार्टमेंट’ ही पाच मजली इमारत आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोसळली. या इमारतीला काल अनेक ठिकाणी तडे गेले होते. तसेच अनेक ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळं महापालिकेनं ही इमारत रिकामी केली होती. जवळपास १०० जणांना स्थलांतरित केले होते. इमारत वेळीच रिकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.

दैव बलवत्तर…

उल्हासनगर कॅम्प दोन भागातील लिंकरोड परिसरात असलेल्या ‘महक अपार्टमेंट’ या इमारतीतील १०२ फ्लॅटचे दरवाजे सोमवारी पहाटे आतून उघडत नव्हते. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधत मदत मागितली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत फ्लॅटचे दरवाजे उघडून दिले. अन्य सदनिकाधारकांचेही दरवाजे उघडत नसल्याने अग्निशमन दलाने इमारतीची पाहणी केली. इमारतीचा खांब खचल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच या प्रभागातील लोकप्रतिनिधी नरेंद्र ठाकूर आणि नारायण पंजाबी यांनी या घटनेची माहिती वास्तुविशारद भूषण कटारिया यांना दिल्यानंतर त्यांनीही इमारतीची पाहणी केली. त्यांना इमारतीचा मधला खांब खचल्याचे आढळले. याबाबत महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना कळवले. यानंतर शिंपी यांनी रहिवाशांना पंधरा मिनिटांचा वेळ देत, घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलाने या इमारतीतील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. महापालिकेने ही इमारत सील केली. वेळेवर इमारत रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *