नागपुरात ट्रायल रुममध्ये मोबाईलने तरुणीचं चित्रीकरण, आरोपींना अटक

नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात एका कपड्याच्या दुकानात ट्रायल रुममध्ये मोबाईल सापडला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून तरुणांचं चित्रीकरण होत असल्याचं समोर आलं आहे. एका तरुणीने हा सर्व प्रकार समोर आणला आहे. दुकानात काम करणाऱ्या तरुणाने हा मोबाईल ठेवल्याचं समोर आलं. तरुणीने जेव्हा मोबाईल पाहिला तेव्हा तिला तिच्यासह अनेक तरुणींचे व्हिडिओ असल्याचं देखील कळत आहे. दुकानदाराला तरुणीने जाब विचारल्यानंतर त्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने पोलिसात तक्रार केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपुरातील कपड्यांची दुकानं, मॉल आणि शोरुममधील ट्रायल रुम तपासणीसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलंय. सीताबर्डीमधल्या फ्रेण्डस नावाच्या दुकानात ट्रायल रुममध्ये मोबाईल लपवून तरुणीचं चित्रीकरण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी हे पथक कोणत्याही अचानाक भेट देत ट्रायल रूमची तपासणी करणार आहे.

महिलांनीही ट्रायल रुमचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहितीही पोलिसांकडून दिली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *