दिल्ली विमानतळावर सुरक्षतेत वाढ; प्रवाशांना तीन तास आधी यावं लागणार

दिल्ली विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच आता प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा तपासणीसाठी विमानतळावर लवकर पोहोचावे लागणार आहे. तसेच प्रवाशांना भेटण्यासाठी असलेल्या जागीही जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्णय घेण्यात आले आहेत.

 दिल्ली विमानतळावरील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. दरम्यान, देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवशांनी आपल्या निर्धारित वेळेच्या तीन तास आधी, तर परदेशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या निर्धारित वेळेच्या चार तास आधी विमानतळावर पोहोचावे लागणार आहे. तसेच प्रवाशांना भेटण्यासाठी असलेल्या जागीही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्टदरम्यान या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *