गोणीमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मालाडच्या मढ येथील समुद्रात मंगळवारी सकाळी एका प्लास्टिक गोणीमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मढ येथील कोळीवाड्यातील मच्छिमार मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी गेले होते. किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना पाण्यामध्ये एक गोणी दिसली. गोणी उघडताच आतमध्ये एका महिलेचा मृतदेह कोंबलेला दिसला. या महिलेचा एक पाय कापण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच मालवणी पोलिस घटनास्थळी पोहोचले. महिलेचा मृतदेह बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *