मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी आंदोलनकर्त्या महिलेचा हात पकडला

मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एक व्हि़डिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महाडेश्वर यांना घेराव घातलेल्या आंदोलक महिलांपैकी एका महिलेचा चक्क हातच महापौरांनी पकडला आहे. तुम्ही हात मुरगळताय असा आवाज इतर आंदोलक महिलांनी केल्याचंही दृश्यांमध्ये दिसून येतं आहे.

मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे सांताक्रूजमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. त्यात एका कुटुंबातल्या माय लेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यूही झाला. यावेळी महापौरांना भेटीसाठी वारंवार विचारणा करुनही महापौर आले नसल्यानं स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केलं. सोमवारी महापौर भेटण्यासाठी गेले असताना स्थानिकांनी महापौरांना घेराव घातला, पण यावेळी महिला आपला रोष व्यक्त करत असतानाच महापौरांनी थेट महिलेचा हात पकडला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेल्या या दादागिरीवर संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *