आता मुस्लिमांना गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करता येईल: भाजप आमदार

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजप आमदार विक्रम सैनी पुन्हा एकदा बरळले आहेत. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करताना सैनी यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, ‘देशातील मुस्लिमांनी खुश व्हायला हवे. ते आता न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करू शकतात. इतकंच नाही तर भाजपचे अविवाहित नेतेही आता काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात आणि लग्न करू शकतात.’

काश्मीरला लागू असलेले कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाच्या स्वागतासाठी कठौली येथे शेकडो भाजप कार्यकर्ते एकत्र जमले होते. या कार्यक्रमाला सैनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *