मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या पोलादपूर या ठिकाणी रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणातील वाहतूक विन्हेरे, तुळशीखिंड मार्गे वळवण्यात आली आहे. झाड कोसळल्याने १ कार आणि दुचाकींचे पूर्ण नुकसान झालं आहे. कारमधला पती पत्नी पंक्चर काढण्यासाठी कारबाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. आता महामार्ग विभाग आणि तसेच ठेकेदार कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून झाड बाजूला काम सुरु आहे.
दरम्यान महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी रात्री महाड शहरात पुराचे पाणी शिरले होते. बाजारपेठेत कमरेपर्यंत पाणी होते. भगवानदास बेकरीपर्यंत पाणी होते. तसेच महाडच्या चवदार तळ्यातून पाणी बाहेर फेकले जात होते. गांधारी नदीवर असलेला पूल पाण्याखाली आहे . जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाचा जोर कमी असला तरी जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय , संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी लष्करासह एन डी आर एफ ची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
