शिर्डी विमानतळावर धावपट्टी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका वैमानिकाचं निलंबन करण्यात आलं आहे. नागरी उड्डाण संचालनालयाकडून वैमानिकाचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.
ही घटना 29 एप्रिल रोजी विमानाचं लँडिंग करतेवेळी घडली होती. कॅप्टन आशिष जैस्वाल स्पाइसजेट बी 737 या विमानाचे वैमानिक होते. लँडिंग करतेवेळी ते विमानतळाच्या मुख्य धावपट्टीपासून जवळपास 5 हजार 300 फूट पुढे गेले. याशिवाय विमान लँडिंग करण्याआधी आवश्यक उंचीपेक्षा अधिक उंचावर होते, असं नागरी उड्डाण संचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे.
घटनेच्या दिवसानंतर नागरी उड्डाण संचालनालयाकडून याबाबत चौकशी सुरू होती, चौकशी पूर्ण झाल्यानंतर वैमानिकावर कारवाई करण्यात आली आहे.
