दिल्लीत इमारतीला आग; ६ मृत्युमुखी

दिल्लीत झाकिर नगर भागात एका बहुमजली इमारतीला आग लागून ६ जण मृत्युमुखी पडले तर ११ जण जखमी झाले. अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले असून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.

झाकिर नगर भागात काल रात्री ही आग लागली. अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या २० जणांची सुखरुप सुटका केली. मात्र ६ जण आगीत दगावले. इमारतीच्या मीटर बोर्डमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. एका महिलेने जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.ही इमारत तळमजला धरून पाच मजली आहे. या आगीत इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या गाड्याही जळल्या. एकूण २ चारचाकी आणि ८ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. ही इमारत तळमजला धरून पाच मजली आहे. या आगीत इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या गाड्याही जळल्या. एकूण २ चारचाकी आणि ८ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *