मिरारोड मध्ये २५ फूट उंचीचे रुद्राक्षाचे शिवलिंग

श्रावण महिन्यातील धार्मिक विधीसाठी मिरा रोडच्या बापा सीताराम मंदिरात दोन लाख २५ हजार पंचमुखी रुद्राक्षांचा वापर करत २५ फूट उंचीचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात रोज या शिवलिंगाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे.

मिरारोड येथील पूनम सागर भागातील आयप्पा मंदिराजवळ असलेल्या बापा सीताराम मंदिरात श्रावण महिन्यातील धार्मिक विधीसाठी २५ फूट उंचीचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. दोन लाख २५ हजार पंचमुखी रुद्राक्ष तांब्याच्या तारेनी बांधून हे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ज्योतिषी शास्त्री आशिष दवे यांच्या प्रेरणेने तयार केलेल्या या शिवलिंगावर ३० ऑगस्टपर्यंत रोज धार्मिक विधी होणार असून त्यात होमासह लघुरुद्र, महारुद्र महायज्ञ, अतिरुद्र महायज्ञ, बिल्वपत्र अनुष्ठान, महामृत्यूंजय मंत्रजप, असे विविध विधी करण्यात येणार असल्याचे बापा सीताराम सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल विराणी यांनी सांगितले. सत्यनारायण महापूजेने याची सांगता होणार आहे. मिरा-भाईंदर तसेच परिसरातील शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बापा सीताराम सेवा संस्थेचे राजू पटेल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *