पुण्यात जावायानेच घेतला सासऱ्याच्या गालाचा चावा

जावायाने किरकोळ कारणावरुन सासºयाच्या गालाचा  चावा घेतल्याची घटना  हडपसरमध्ये घडली आहे. या प्रकरणी दोघांनी हडपसर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खंडू संतराम चौधरी (२८, रा. काळेपडळ, हडपसर) असे जावयाचे नाव आहे. तर मच्छिंद्र येडूबा शिंदे (रा. पाटोदा बीड) असे सासºयाचे नाव आहे. खंडू आणि राणीचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले आहे. मात्र, जावई मुलीशी फोनवर बोलू देत नसल्याने सासरे मच्छिंद्र आणि खंडू यांच्यात फोनवर बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने खंडूने सासºयाला पुण्यात यायला सांगितले. त्यानुसार पाटोदा येथून सासू-सासरे आणि एक नातेवाईक खंडूच्या हडपसर येथील घरी आले होते.

जावयाच्या घरी चहापाणी घेतल्यानंतर सासरे मच्छिंद्र आणि जावई खंडूमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्यावेळी मच्छिंद्रने मुलीला फोनवर बोलू का देत नाही अशी विचारणा जावई खंडूला केली. त्याचा राग आल्याने खंडूने थेट सासरेबुवांच्या अंगावर धावून जात त्यांच्या गालाचा करकचून चावा घेतला. तसेच हाताच्या बोटाचा चावून तुकडा पाडला. मच्छिंद्रला गंभीर जखमी केल्यामुळे खंडूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुलीसोबत बोलणे होऊ देत नसल्याच्या कारणावरुन मच्छिंद्रसह पत्नी राणी, सासूने खंडूला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून  जावई आणि सासरे यांच्यात भांडणे झाली त्याचा राग आल्याने जावायाने सासºयाच्या गालाचा आणि हाताचा चावा  घेतला. तसेच पत्नी, सासºयासह इतर नातेवाईकांनी जावयाला मारहाण केली आहे. त्यानुसार परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *