मी सनी लिओनी नाही, मला फोन करु नका

अभिनेत्री सनी लिओनीमुळे दिल्लीतला एक तरुण वैतागला आहे. कारण त्याच्या फोन नंबरवर सनी लिओनीला संपर्क करण्यासाठी सुमारे ३०० फोन रोज येत आहेत. मी सनी लिओनी नाही मला फोन करु नका हे सांगून सांगून हा तरुण बेजार झाला आहे. दिल्लीतल्या पुनीत अग्रवाल या तरुणाला हा त्रास सहन करावा लागतो आहे. मी लोकांना समजावून सांगतो मात्र ते ऐकतच नाहीत असंही पुनीतने म्हटलं आहे.

‘अर्जुन पटियाला’ या सिनेमात अभिनेत्री सनी लिओनीने एका सीनमध्ये तिचा फोन नंबर सांगितला. तिने हा नंबर सांगितल्यावर लोकांना वाटतंय की हा तिचाच नंबर आहे. मात्र हा फोन नंबर दिल्लीतील पीतमपुरा भागात वास्तव्य करणाऱ्या पुनीत अग्रवाल या तरुणाचा आहे. त्यामुळे लोक सनी लिओनीशी बोलायचं आहे असं सांगत पुनीतला दररोज फोन करत आहेत. पुनीत त्यांना मी सनी लिओनी नाही हे सांगून सांगून थकला आहे. मात्र सिनेमातल्या एका सीनमुळे पुनीतची डोकेदुखी वाढली आहे.

मागच्या शुक्रवारी ‘अर्जुन पटियाला’ सिनेमा रिलिज झाला. त्या सिनेमातल्या एका प्रसंगात सनी लिओनीने तिचा फोन नंबर सांगितला. मात्र हा नंबर दिल्लीत राहणाऱ्या पुनीत अग्रवालचा आहे. रात्रंदिवस पुनीतला फोन येत आहेत त्याच्याकडे सनी लिओनीला फोन द्या अशी मागणी केली जाते. सिनेमात माझ्या संमतीशिवाय माझा नंबर कसा वापरण्यात आला? असा प्रश्न आता पुनीतने विचारला आहे. तसेच रोज येणाऱ्या फोन कॉल्समुळे तो चांगलाच बेजार झाला आहे. आता याप्रकरणी पुनीतने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कारण काही नंबर्सवरुन कॉल करणारे लोक त्याच्याशी थेट अश्लील भाषेतच बोलू लागतात. आम्ही या प्रकरणात तक्रार नोंदवून घेतली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *