कळव्यात चाळीवर दरड कोसळली, २ ठार, १ जखमी

ठाणे: कळवा परिसरातील अटकोनेश्वर नगरमधील आदर्श चाळीवर डोंगराचा काही भाग कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे.

 आज पहाटे ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली तीन जण अडकले होते. त्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बीरेंद्र जसवार (४०) आणि सनी जसवार (१०) यांचा समावेश आहे. तर, जखमी नीलम जसवार यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांपैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *