घोरपडे पेठेतील इमारतीचा भाग कोसळला

पुण्यातल्या घोरपडे पेठ भागात असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील राष्ट्रभूषण चौकातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिसर्‍या मजल्यावर सात कुटुंब राहत होते. त्या सर्वाना खाली आणण्यात आले असून लाकडी आणि मातीचं जुनं बांधकाम आहे. त्यामुळे इमारतीचा काही भाग पडला असावा. तसेच आता पुणे महापालिकेचा पाडकाम विभागामार्फत धोकादायक भाग पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *