भजी खाल्याचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार

भजी खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागणाऱ्या हॉटेलचालकावर त्याच्या घरी जाऊन कोयत्याने वार करण्यात आले. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मित्रालादेखील मारहाण करून वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (२४ जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी राहुल प्रल्हाद झेंडे (वय ३६, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार आशुतोष काटे, आतु शेख, महेश जगताप, सलीम पापा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राहुल यांचे पिंपळे सौदागर येथे नाष्टा सेंटर आहे. आरोपींनी बुधवारी त्यांच्या नाष्टा सेंटरवर जाऊन भजी खाल्ली. राहुल यांनी आरोपींकडे पैसे मागितले. याचा राग धरून आरोपींनी राहुल यांच्या घरी जाऊन त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केले. भांडण सोडविण्यासाठी गेलेले राहुल यांचे मित्र मौलाना शेख यांनाही आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून कोयत्याने वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी महेश जगताप याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *