यवतमाळ जिल्ह्यात झाड पडून मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर

पिंपळखुटा येथील दोघेजण यवतमाळकडे जात असताना बानायतजवळ त्यांच्या गाडीवर झाड कोसळून एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले आहे. अद्याप या दोघांची नावे व पत्ते मिळालेले नाहीत.
बांधकाम विभागाने जुने झाड कापले नाही म्हणून हा अपघात झाला असे नागरिकांचे म्हणणे असून, या अपघाताच्या निषेधार्थ दारव्हा-यवतमाळ रोडवरील तिवसा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *