सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार करून केला त्या चिमुरडीचा खून

पिंपळे सौदागर येथील एका अडीच वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार करून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २३) झाला. सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार करून खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडित कुटुंब पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर बांधकाम मजुरांच्या कॅम्पमधील पत्राशेडमध्ये वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री साडे अकराला अडीच वर्षांची चिमुरडी आईसोबत झोपली होती. त्यावेळी चिमुरडीला आरोपी उचलून घेऊन गेला. तिच्या आईला जाग आल्यानंतर चिमुरडीची शोधाशोध करण्यात आली. मात्र चिमुरडीचा शोध लागला नाही. त्यामुळे याबाबत सांगवी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनीही शोध सुरू केला. बुधवारी पहाटे पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीत चिमुरडीचा मृतदेह सापडला. लैंगिक अत्याचार करून चिमुरडीचा खून करण्यात आला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *